¡Sorpréndeme!

हिंजवडीत बगाड तुटल्याची घटना; सुदैवाने कसलीही जीवितहानी नाही | Pimpari Chinchwad

2023-04-07 0 Dailymotion

पिंपरी चिंचवडलगतच्या हिंजवडीत बगाड मधोमध तुटल्याची घटना घडली. बगाड तुटल्याने यंदाचे गळकरी खाली कोसळले मात्र सुदैवाने यात कोणालाही गंभीर इजा झाली नाही. हिंजवडी गावातील म्हातोबा देवाची यात्रा निघाली होती. अनेक वर्षांच्या परंपरेनुसार या यात्रेत बगाडाची प्रथा आहे. यंदा श्रीधर जांभुळकर यांना गळकरीचा मान होता. सायंकाळी बगाड सुरू झालं, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी सुरू झाली. सर्वजण उत्साहात असतानाच हे बगाड मधोमध तुटलं.